ठेवींवरील व्याजदर
ठेवींवरील व्याजदर
सदरचे व्याजदर दि.01.11.2025 पासुन लागु होतील.
| अनू. क्र. | ठेविचा कालावधी | सुधारित/प्रस्थावित व्याजदर |
| १. | सेविंग्स खाते | ३.००% |
| २. | १५ दिवस ते ३० दिवस | ३.००% |
| ३. | ३१ दिवस ते ९० दिवस | ४.००% |
| ४. | ९१ दिवस ते १८० दिवस | ५.००% |
| ५. | १८१ दिवस ते १ वर्ष | ६.५०% |
| ६. | १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष | ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५% |
| ७. | २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष | ७.२५% ज्येष्ठ नागरिक ७.५०% |
| ८. | ३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष | ७.०० % ज्येष्ठ नागरिक ७.२५ % |
| ९. | ५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष | ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५% |
सदर सुधारीत ठेवींच्या व्याजदरासंदर्भात नियम व अटी पुर्वीप्रमाणेच म्हणजेच खालीलप्रमाणे राहतील.
- रिकरींग ठेवीमध्ये रू.100.00 च्या पटीमध्ये खाते उघडणेत यावे वरील मुदतीप्रमाणेच रिकरींग ठेवीस व्याजदर राहतील. (रिकरींग ठेव कमीत
- कमी 15 महिन्याचे व त्यापुढे तिमाहीचे पटीत उघडणेत यावी)
- 15 दिवस ते 365 दिवस या कालावधी मधील ठेवी “मुदतठेव” प्रकारात घ्याव्यात.
- अल्पबचत ठेव योजनेस 2% प्रमाणे व्याज आकारणी केली जाईल.
- पिग्मी एजंट सिक्युरीटी डीपॉझीटला 7% प्रमाणे व्याज आकारणी केली जाईल.
- पुर्नठेव योजनेत रक्कम स्विकारताना त्या ठेवींचा कालावधी किमान 15 महिने व त्यापुढे तिमाहीचे पटीत घ्यावे. उदा.मुदत 15 महिने, 18 महिने, 21 महिने अशा प्रकारे पुर्नठेव योजनेत ठेव घेण्यात यावी किंवा अखेर मुदत देण्यात यावी.
- जेष्ठ नागरीकांसाठी 1 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष या मुदतीमधील रक्कमेच्या कालावधीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा 0.25% जादा व्याज दिले जाईल.
- 1 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष या मुदतीमधील सर्व ठेवीदारांना रू.15.00 लाख व त्यावरील रक्कमेच्या एक मुदतठेव पावतीस प्रचलित व्याजदारापेक्षा 0.25% जादा व्याज दिले जाईल.
- बँकेच्या आजी, माजी सेवकवर्गाला 1.00% जादा व्याजदर लागु राहील.
- बँकेच्या माजी जेष्ठ नागरिक सेवकवर्गाला 0.25% जादा व 1.00% जादा असा एकुण 1.25% व्याजदर लागू राहील.
धनलक्ष्मी ठेव योजना
तसेच दि.01.11.2025 पासून बँकेकडील सुरू आलेली अमृत संचय ठेव योजना ही बंद करणेत येत असून बँकेला कर्ज पुरवठयाकरीता फंडस उपलब्ध व्हावे तसेच ठेवीमध्ये स्थिरता राखणे व सीडी रेशोचे आदर्श प्रमाण राखणेकरीता रक्कम रू.15.00 लक्ष(एक पावती) व त्यावरील ठेवीकरीता 25 महिने मुदतीकरीता सरळ व्याजाची खालिलप्रमाणे “धनलक्ष्मी ठेव” योजना दि.01.11.2025 पासुन सुरू करणेस मान्यता देणेत आली आहे.
| ठेव योजना | तपशील | |
| 1. | धनलक्ष्मी ठेव योजना | 7.50% (सरळव्याज) |
| 2. | कालावधी | 25 महिने |
सदर “धनवर्षा ठेव” योजनेस अनुसरून खालिल नियम व अटी लागु राहतील.
- सदरची सुविधा दि.01.11.2025 पासून वैयक्तीक ठेवीदार, सहाकारी संस्था, जेष्ठ नागरीक, ट्रस्ट व इतर संस्था यांच्या ठेवींसाठी लागू होईल.
- सदर सुविधेमधील ठेव खाती मुदत ठेव प्रकारात (सरळव्याज पध्दतीने) उघडणेत यावीत.दरमहा, तिमाही पध्दतीने व्याज मागणी करणाAया ठेवीदारांना या सुविधेचा लाभ देता येईल.
- सदर ठेव योजनेवर इतर कोणताही अतिरीक्त व्याजदराचा लाभ सदर ठेवीवर देता येणार नाही.
- जेष्ठ नागरीकांना 0.25% जादा व्याजदर लागू राहील.
- बँकेच्या आजी, माजी सेवकवर्गाला 1.00% जादा व्याजदर लागु राहील.
- बँकेच्या माजी जेष्ठ नागरिक सेवकवर्गाला 0.25% जादा व 1.00% जादा असा एकुण 1.25% व्याजदर लागू राहील.
- ठेवीचा ओघ विचारात घेवून सदरची योजना पुढे सुरू ठेवणेबाबत निर्णय घेणेत येईल.
- सदर मुदतठेव सीबीएस प्रणालीमध्ये उघडतेवेळी काही अडचणी आल्यास संगणक विभागाशी संपर्क करावा.
